Posts

एक सांज नात्याची....

Image
तो उगाच उदास वाणा बसलेला, उगाच असेल का पण? नाही त्याच्या मनात असतील असंख्य प्रश्न. कारण एरवी सर्वांना घेऊन चालणारा तो आज असा का वागतोय अचानक. नक्कीच काहीं तरी बिनसलंय. मी सहज म्हणून त्याला बोललो. “कसा आहेस...” त्याच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं, मला कळला त्या पाण्या मागचा अर्थं पण मी तरी काय करणार होतो त्याच्या साठी.  पण न कळत तो बोलून गेला. "तुला माहितीये मित्रा गेली चार महिने या एकाच प्रश्नाची आस ठेऊन जगत आहे रे मी, कि एकदाच फक्त एकदा तिने म्हणावं. “कसा आहेस..” आणि मी मौनातुनच बोलावं “तुझ्या शिवाय कसा असेन..” तिने माझं मौन ओळखावं अलगद डोळ्यातल्या पाण्याला स्वतःच्या हाताने टिपाव. आणि.." 'आणि काय...' "नाही काहीच नाही." 'मोकळा झालास बोलून तर सुटशील.' "मला मघार घ्यायची नव्हतीच कधी पण..." बोलता बोलता तो अडखळला. त्याला आलेला आवंढा त्याने तितकाच शिताफीने गिळला, मी जवळ जाऊन ताच्या खांद्यावर हात ठेवला त्याचा तोल गेला, म्हणाला  "मित्रा जिवंतपणा हरवलाय रे.." मी म्हाणालो “तुझे हे प्रश्न नाही रे कळत मला, थोडा सरळ बो

"कुणास ठाऊक"....

Image
तुला माझी आठवण येत असेल कि नाही "कुणास ठाऊक" अचानक समोरा समोर येणं ... नकळत बघून ओळख नदाखवणं खेळ असा माझा तुझा सुरूच राहायचा वरामवार पण हे सगळं खरा होईल काहीच नव्हतं "कुणास ठाऊक", खेळता खेळता तुझं क्षणात रुसणं बोलता बोलता खदखदून तुझं हसणं अचानक दूर झाल्यानी आपल्या पदरी फक्त रडणं पण! आनंदाचे ते दिवस तुला आठवेल कि नाही "कुणास ठाऊक", माझी तुझी परत भेट कधी होईल का? परत तसाच हसत खेळत आपला वेळ जाईल का? पण! तुला मी कोण हे आठवेल कि नाही "कुणास ठाऊक", आठवणीच्या सवल्या घेरून बसल्या मला मी परत वळेल ही मी परत येईल ही मधुर त्या आठवणीत परत रमून जाईल ही पण! तुला तुझ्या घरचं कुणी पाठवेल कि नाही कुणास ठाऊक आयुष्यातले ते दिवस तुला आठवेल कि नाही "कुणास ठाऊक".... तुला माझी आठवण येत असेल कि नाही "कुणास ठाऊक" - गौरव खोंड २२-०३-२०१२ See More    

तो एक बिनधास्त .....

तो एक बिनधास्त ..... मी नेहमीच आई-बाबांच्या सावलीत वाढलेलो, माझे शिक्षण बारावी पर्यंत माझ्याच गावात झला. मी मुळात घबराट स्वभावाचा नेहमी एकाकी राहणारा , कुणाच्या अध्यात-मध्यात न पडणारा. अगदी सर्वसाधारण कुटुंबातून अलालेलो , वडील सरकारी नौकरीत तृतीय श्रेणी वर कार्यरत होते. त्यांनी नेहमी शिकवलं कि पैसा जपून खर्च करावा आणि नवीन व्यक्तीशी पैश्याचा व्यवहार जरा जपूनच करावा. वडील फार शांत त्यांनी कधी माझ्यावर हात उगारला नाही कि कधी रागावल हि नाही. आई घरीच असायची अस माझं आयुष्य चाल्ल होत. पण ......        आयुष्याच्या एका वळणावर प्रत्येक व्यक्तीला याश्याच्या शोधात घर सोडव लागत, पण मला काही घराचा मोह सोडवे ना. म्हणतात ना "पक्षी एकदा मोठा झला कि त्याला नवीन घरट्यच्य शोधात जून घरट सोडव लागत" तसाच काही तरी म्हणून मला पण घर सोडव लागलं. उच्च्या शिक्षण घ्यायला बाहेत पडलो. मनात सतत घर आणि घरच होता. आई-वडलांचा मोह काही सोडवेना वाटलं जणू डोक्यावरची छाया कमी झल्या सारख वाटलं, समोर भावित्या घडवण्याची चिंता सुद्धा होती ... कारण डोळ्यात स्वप्ना होत हे सर्वसाधारण आयुष्य बदलण्याचं, एकदा विचार आला &
ते दोघ तो वाद आणि बसsssss...... मी आणि ते असे आमचे धम्माल त्रिकुट (त्रिकुट म्हणायला हरकात नाही) सतत सोबत राहणारे. एकमेकांसाठी वाट्टेल ते करयला तयार अश्णारे. मात्र त्या दोघात कालांतराने मैत्री जास्त घट्ट होत गेली अन मी हरवत गेलो एकांतात. पण काय म्हणतात न जिथे खूप जवळीक असते अश्या नात्यांना नझर लगेच लागते तसच काही तरी त्यांचात घडल अन त्यात माझी मात्र सतत फरफट होत राहिली, मन द्विधा मनस्थितीत गुरफटत जात होत कारण मी फक्त उरलो होतो त्यांच्यातला दुवा, संदेशाची देवाण घेवान करणारा, मी नुसताच उदास होत होतो. तो वाद मात्र अजून चिघळत चालला होत. त्या वादाला सुरवात झली तेव्हा मात्र मी त्यांचात नव्हतो, मी आपला मजेत जगणारा, मस्त राहणारा पण एकटाच उरलो होतो. ते राहायचे सोबत शिक्षण्याच्या निमित्याने ..... मी सहज गेलो भेटायला म्हणून तेव्हा माझ्या लक्षात आलं त्यांच्यातल अंतर, पण तेव्हा वेळ खूप निघून गेलेला होत..... तेव्हा फार वाईट वाटलं, विचार केला काही उपाय करावा, मग खूप विचार करत बसलो अगदी मनाच्या खोलीतील प्रत्येक उपाय विचारात आणून बघितला पण उत्तर एकाच "सगळं संपलय" पण त्यांचा तो दिखावा मात